• लिंबूच्या रसात मोठ्या प्रमाणात व्हिटामीन सी आणि मधामध्ये एन्टीबॅटेरिअल तत्व असतात. जे शरिरातून टॉक्सिन्स काढतात. लिंबू आणि मध सेवन आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढवतात आणि पचन क्रिया चांगली होते
  •  मध रोज खाल्याने त्वचा डीटॉक्सिफाइड होते. आणि त्वचेवर संक्रमण आणि अॅलर्जीचा धोका कमी होतो.
  • वजन कमी करण्यासाठी मध-लिंबू सेवन खूप फायद्याचे ठरते. लिंबूमध्ये विरघळणारे फायबर पॅकटीनचे प्रमाण अधिक असते. ते वचन कमी करण्यासाठी फायद्याचे असते. हे खाणे वजन कमी करण्यासाठी एक घरगुती उपाय आहे.
  •  तात्काळ शरीरात उर्जा निर्माण करण्यासाठी याचे सेवन करणे फायद्याचे ठरते. मधात नैसर्गिकदृष्ट्या कार्बोहाइड्रेट असते. हे खाल्याने शरिरात उर्जेचा स्तर वाढतो आणि यात लिंबू टाकला तर उर्जा तर अधिक वाढते आणि तुमचा मूडही चांगला होतो.
  • मध-लिंबू प्यायल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते. मध आणि लिंबूमध्ये असलेल्या अॅन्टी ऑक्सीडेंट्स रोग प्रतिकारक क्षमता वाढतात.

Leave A Comment

you might also like